
लग्नात भारी होता, तुमच्या बॅण्ड बाजा, मी तर आहे, खुसखुशीत खाजा.

सिव्हिल इंजिनियर बनायला, लागले खूप कष्ट, ____ च नाव घेतो, सर्वांसमोर स्पष्ट.

चांदीच्या ताटात मटणाचं तुकर, ____ राव भरवते घास तोंड करा हिकर..

वोडाफोन, एयरटेल पेक्षा, भारी आहे जिओ सिम, ______आणि _____ कडून सर्वांना, मानाचा जयभीम.

गणपती बाप्पाला, केला होता नवस, ____ च्या मुलाचा आज, बारशाचा दिवस.

नव्या नवरीला शोभतो, हिरव्या बांगड्यांचा चुडा, ____ आणि ___ चा आहे आज साखरपुडा.

इंस्टाग्रामच्या बायोला, टाकला आहे फुडी, ____ राव आहेत खूप मुडी.

आयुष्यात सुख- दुःख, दोन्ही असावे. ___ रावांसारखे पती, जन्मो-जन्मी मिळावे.

पूजेला नटण्यासाठी, बायका असतात खूप हौशी, ____ रावांचे नाव घेते, सत्यनारायण पूजेच्या दिवशी.

काकवी पासून बनवतात गुळ, ___रावांचे नाव घेऊन, वाटते तिळगुळ

खूप फेमस आहे, पुण्यामध्ये शनिवार पेठ, ___ सगळीकडे जाऊया, लॉकडाउन नंतर भेट.

दादर चौपाटीवर बसून, समुद्राची बघायला आवडते लाट, ___आपल्या लग्नाची, मी खूप बघते वाट.