Connect with us

101 Vat Purnima Ukhane Marathi | वटपौर्णिमा उखाणे.

vat purnima ukhane marathi

या सणाच्या निमित्ताने स्त्रिया Vat Purnima Ukhane म्हणतात. Vat Purnima हा खूप मोठा सण म्हणून ओळखला जातो. वटपौर्णिमा हा महाराष्ट्रामधील मोठ्या सणांपैकी एक सण आहे. वटपौर्णिमेला फणसाची खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते.

WhatsApp Group Join Now

या सणाला बायका आपल्या पतीसाठी उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य मिळावे यासाठी प्रार्थना करतात. यावेळी भरपूर बायका जमतात आणि उखाणे देखील म्हणतात. या दिवशी वटवृक्षाची झाडे, वडाच्या झाडाची पूजा करतात. Vat Purnima Ukhane तुम्ही तुमच्या मित्रपरिवारासोबत शेयर करू शकता.

1- चांदणचाहूल होती, कोवळ्या पाऊली,
_________ रावांची सर्व इच्छा पूर्ण होवो, अशी मागणी करते मी तुझ्याकडे वटसावित्री माऊली.

2- कुंकवाचा साज, असाच कायम राहू द्या,
______ रावांना डोळे भरून, ७ जन्म पाहू द्या.

3- वटपौर्णिमेला व्रत ठेवायची, आहे प्रथा,
________ रावांसोबत ऐकेन आज, वटसावित्रीची कथा.

4- वटपौर्णिमा म्हणून, आपण सर्वांनी मिळून लावूया झाडे,
__________ रावांसाठी प्रार्थना करते, त्यांचे आयुष्य खूप वाढे.

5- संत तुकोबाची वाणी, भक्तीची ती शिकवणी,
________ रावांचे नाव घेते, आज गाऊया सुवासिनींसाठी गाणी.

6- पावसाची झाली सुरवात, आणि आज आहे पहिला सण,
वटवृक्ष बहरले तसेच ______ रावांचे बहरूदे, नेहमी मन.

7- पतीच्या दीर्घयुष्यासाठी, निष्ठेचे बंधन,
______ रावांचे नाव घेऊन करते, सर्वांना वंदन.

8- पाच सुहासिनी स्त्रियांची, ओटी मी भरली,
_____ रावांचे नाव घेते, आज वटपौर्णिमा आहे म्हणून मी सजली.

9- मराठी संस्कृतीची प्रतिमा, सावित्रेच्या निष्ठेचे दर्पण,
_______ रावांसाठी करते मी, माझे जीवन अर्पण.

10- नाती जन्मोजन्माची, दिली परमेश्वराने जुळवून,
लग्नाला माझ्या घरच्यांनी होकार नसता दिला, तर _________ रावांनी मला आणली असती पळवून.

11- वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला, गुंडाळतात धागा,
__________ रावांसाठी माझ्या मनात कधीही, कमी नाही होणार जागा.

12- नवा छंद नवा ध्यास, शोधी नवे आकाश,
________ रावांसोबत लग्न होताच, पडला माझ्या आयुष्यात प्रकाश.

13- वटपौर्णिमेला सुहासिनी, पूजतात वड,
________ रावांचे नाव घ्यायला, मला नाही वाटत जड.

14- हृदयाचा ठोका, शरीराचा झोका,
आज वटपौर्णिमा आहे म्हणून, _____ रावांचे नाव घेण्याचा, भेटला मला मोका.

15- सृष्टीने जसे वडाचे झाड, वर्षानुवर्षे जपले,
_______ सुखी राहूद्या जन्मोजन्मी, असेच नाते अपुले.

Haldi Kunku Ukhane <—-क्लिक करा

16- हवी अंधारल्या राती, चंद्र किरणांची साथ,
________ रावांची हवी मला, ७ जन्माची साथ.

17- खुळ काळीज हे माझं, तुला दिल मी आंदण,
_________ रावांच्या संसारात, सुखाने नांदण.

18- आजच्या दिवशी, वडाची पूजा करण्याची आहे प्रथा,
________ रावांसोबत ऐकेन मी, सावित्री आणि सत्यवानाची कथा.

19- श्रेया घोषाल, खूप सुंदर मराठी गाणी गाते,
______ तुझ्यासवे सप्त जन्मीचे, होवो माझे नाते.

20- झाडे लावा, झाडे तोडून नका देऊ निसर्गाला त्रास,
_______ रावांचे नाव घेते, आज वटपौर्णिमेसाठी खास.

21- देव आहे चोहीकडे, डोळे मिटून बघावे,
_________ रावांचे नाव घेते, सर्वांनी ऐकावे.

22- पाऊस पडताच, उजळून जाती सृष्टी,
______ आणि _______च्या नात्याला, नको लागो कोणाची द्रुष्टी.

23- सण आहे आज वटपौर्णिमेचा,
_______ रावांसोबत असाच, संसार राहूदे सुखाचा.

24- मराठी सण म्हणजे, आनंदाचा क्षण,
_______ रावांचे नाव घेते, सुखी राहुदेत सर्वजण.

25- पावसाच्या येण्याने, पक्षांचे चालले आहे कूजन,
________ रावांचे नाव घेते, आणि वडाचे करते पूजन.

26- सर्व महिला जमल्या आज, म्हणून खेळूया काही गेम,
_______ रावांचे प्रेम राहूदे, आयुष्यभर माझ्यावर सेम.

27- वटपौर्णिमा म्ह्णून आज, बाजारातून आणले फणसाचे गरे,
___________ रावांचे नाव घेते, अशेच सुखी राहुद्यात सारे.

28- देवच बनवतो, ७ जन्माची गाठ,
_______ रावांच्या दीर्घआयुष्यासाठी, वडाला फेरे मारते सात.

29- पावसाच्या सुंदर वातावरणाने, सुखी आहेत पक्षी,
________ रावांचे नाव घेते, तुम्ही आहात सर्वजण साक्षी.

30- आज मागणे मागते देवाला, पूर्ण होऊदेत तुमच्या ईच्छा,
______ रावांचे नाव घेते, वटपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

31- वट पौर्णिमेचे व्रत, निष्टेने करते,
_______ रावांसाठी मी, दीर्घायुष्य मागते.

32- आयुष्यात सुख- दुःख, दोन्ही असावे.
_______ रावांसारखे पती, जन्मो-जन्मी मिळावे.

33- आज पहिलीच आहे, माझी वटपौर्णिमा,
_________ रावांसोबत, एकही क्षण करमेना.

34- आज वटपौर्णिमा म्हणून, सात फेरे मारते मी वडाला.
सातही जन्मी मिळूदे _____ रावांसारखे पती, असे मागणे मागते देवाला.

35- बोलत असताना, होते मी मग्न,
_____ रावांसारखे पती भेटूदेत, सात जन्म.

36- वडाला घालते फेरे, आणि देवाला करते नवस,
_____ रावांचे नाव घेते, आज आहे वटपौर्णिमेचा दिवस.

37- वडाची पूजा करते, ठेवुनी निर्मळ मन,
______ रावांचे नाव घेते, आज आहे वटपौर्णिमेचा सण.

38- आज आहे वटपौर्णिमा, म्हणून ठेवला मी उपवास,
_____ रावांचे नाव घेते, तुमच्या सर्वांसाठी खास.

39- झाडे लावा झाडे जगवा, अशी मी करते आपल्याकडे मागणी,
________ रावांचे नाव घेते, साथ जन्मी असूदेत, त्यांची मी साजणी.

40- आज आहे वटपौर्णिमेचा सण,
______ रावांचे सुखी राहूदेत तन, मन, धन.

41- वटपौर्णिमेच्या दिवशी, वडाची पूजा मी करते,
____ रावांना १०० वर्ष आयुष्य भेटूदे, हीच ईश्वर चरणी प्रार्थना करते.

42- वटपौर्णिमा म्हणजे, साथ जन्माच्या गाठी,
________ राव भेटूदेत मला, सात जन्मासाठी.

43- आज आहे माझी पहिली, वट सावित्री,
________ रावांचे नाव घेते, होऊदेत त्यांची अखंड किर्ती.

44- वडाची पूजा करते, आणि मागणे मागते सुखी राहूदे सृष्टी,
________ रावांचे नाव घेते, देवा नेहमी असुदे आमच्यावर तुझी दृष्टी.

45- वडाची फांदी लावून, करते मी वृक्षारोपण,
_________ रावांच्या म्हणण्याप्रमाणे करेन, मी परिवाराचे संगोपन.

46- वडाच्या झाडाला फेऱ्या घालण्यासाठी, जमल्या साऱ्या बायका,
_____ रावांचे नाव घेते, सर्वजण ऐका.

47- पोथी, पुराणे वाचून, बोध होतो मनाला,
_______ रावांचे नाव घेते, वड सावित्री मनाला.

48- वडाची पूजा करून, गुंडाळते सफेद धागा,
_____ रावांच्या जीवनात, सदैव असुदे माझ्यासाठीच जागा.

49- वटवृक्षाचे झाड लावून करूया, वटपौर्णिमा साजरी,
__________ राव म्हणतात, मी आहे फार लाजरी.

50- सत्यवानाचे प्राण वाचवून, वाढविली सावित्रीने सर्वांची शान,
___________ रावांचे नाव घेताना, मला फार वाटतो अभिमान.

51- वडाच्या झाडाइतके, दीर्घायुष्य मिळो तुला,
_________ रावांचे नाव घेते, असेच प्रेम मिळूदे मला.

52- कांजीवरम साडी, बनारसी खण,
_____ रावांचे नाव घेते, आज आहे_____ सण.

53- वटवृक्ष म्हणजे, निसर्गाचा अनमोल ठेवा,
________ रावांची मी, आयुष्यभर करेन सेवा.

54- वटपौर्णिमेला, फणसाची असते खूप मागणी,
______ रावांची ७ जन्मासाठी, बनेल मी साजणी.

55- सुहासिनींचा मेळा जमला, वटपौर्णिमेसाठी,
_______ रावांचे नाव घेऊन, निघाले मी वडाच्या पूजेसाठी.

56- श्रावणात आकाशात पसरला, इंद्रधनुष्याच्या रंग,
________ राव नेहमी सोबत असूदेत, माझ्या संग.

57- लग्नानंतर वटपौर्णिमेचा, माझा पहिला आहे सण,
_________ रावांचे नाव घेते, ठेवून निर्मळ मन.

58- वटपौर्णिमा आहे, सुहासिनींसाठी मोठा सण,
_______ रावांनी जिंकले, पहिल्या भेटीतच माझे मन.

59- प्रार्थना सौभाग्याची, पूजा वटपौणिमेची,
________ रावांचे नाव घेते, सून देशमुखांची.

60- थाटात पार पडला, आज वटपौर्णिमेचा सोहळा,
_______ रावांचे नाव ऐकण्यास, सर्वजण झाले गोळा.

61- सौभाग्यवतींसाठी आहे, वटपौर्णिमेचा सण मोठा,
_________ रावांचे नाव घेते, कधीही नको होउदे त्यांना तोटा.

62- वटपौर्णिमा आहे म्हणून, आज नेसली नवीन साडी,
______ रावांनी आज फिरायला न्हेण्यासाठी बुक केली, ४ चाकी गाडी.

आणखी वाचा- Satyanarayan Pooja Ukhane in Marathi | सत्यनारायण पूजा उखाणे. <—-क्लीक करा

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

Trending

#Ukhane For Female

गणपती बाप्पा आहेत, शंकर पार्वतीचे सुपुत्र, ___ रावांनी घातले मला, सर्वांसमोर मंगळसूत्र.

#Funny Ukhane

किस किस को अपनी लव स्टोरी कहु, _______आज से तुम______ परिवार की बहु.

#Funny Ukhane

बिझनेस मध्ये झाला, गेल्यावर्षी तोटा, तरीपण ___ रावांनी उडवल्या, लग्नात १०० च्या नोटा.

close