Connect with us

101 Makar Sankranti Ukhane | मकरसंक्रांती उखाणे.

makar sankranti ukhane

Makar Sankranti Ukhane हे महिला खूप मोठ्या प्रमाणात घेतात. आपल्या पतीसाठी ते हे उखाणे घेतात. मकर संक्रात हा भारतामधील मोठा सण मानला जातो. यावेळी सर्व जण एकमेकांना तिळगुळ वाटून शुभेच्छा देतात.

WhatsApp Group Join Now

या दिवशी काही ठिकाणी कार्यक्रम देखील ठेवले जातात जिथे सर्व महिला एकत्र येऊन आपल्या पतीसाठी छान असे Makar Sankranti Ukhane घेतात. या दिवशी पतंग खूप मोठ्या प्रमाणात उडवली जाते.

1- मकर संक्रांतीला, काळे कपडे घालण्याचा असतो ट्रेंड,
____________ राव माझे नुसते पती नाहीत, तर आहेत बेस्ट फ्रेंड.

2- लग्नानंतर मकर संक्रात हा, पहिला सण मी करते साजरा,
_________________ रावांचा स्वभाव, आहे फार लाजरा.

3- गुळाणी येते, तिळाला गोडी,
____________ रावांचे नाव घेते, आवडली का आमची जोडी.

4- गोड गुळात, मिसळले तीळ,
_________ रावांना देऊन बसले मी, पहिल्या भेटीतच दिल.

5- दुसऱ्याची पतंग कापायला, पाहिजे धारधार मांजा,
_________ रावांचे नाव घेते, गाव माझे लांजा.

6- आकाशात दिसतोय, पंतंगाचा वेगवेगळा रंग,
___________ राव हवेत मला, ७ जन्मासाठी संग.

7- तिळगुळाचा स्वाद, आणि आनंदाची लहर,
__________ रावांमुळे आली आयुष्यात, सुखाची बहर.

8- नवीन वर्षात आपल्या सर्वांच्या, पूर्ण होवोत ईच्छा,
____________ रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांना, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

9- मकर संक्रांतीचा आज आहे, शुभ पर्व,
__________ रावांचे नाव घेताना, मला वाटतो गर्व.

10- तिळासारखा स्नेह, गुळासारखी गोडी,
_______ रावांचे नाव घेते, सुखी असावी आमची जोडी.

हळदी कुंकू उखाणे वाचा <—-क्लिक करा

11- सूर्याची राशी बदलेल, तुमचे भविष्य,
____________ रावांमुळे, बदलेल माझे आयुष्य.

12- हलव्याचे दागिने, त्यावर काळी साडी,
नेहमी खुश राहो _____ आणि ______ ची जोडी.

13- नाही मोठे पणाची अपेक्षा, नाही दौलताची इच्छा,
________ रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांस, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

14- महालक्ष्मीच्या देवीला, अलंकाराचा साज,
______ रावांचे नाव घेते, संक्रांत आहे आज.

15- आई वडिलांसारखी माया, नसते कोणाला,
_____ रावांचे नाव घेते, संक्रांतीच्या सणाला.

16- तिळगुळ आणि लाडूने करूया, तोंड गोड,
__________ रावांना अशीच असुदे, दोन्ही परिवाराची ओढ.

17- रामायण महाभारतात, बघितले असतील सर्वांनी बाण,
_______ रावांचे नाव घेते, घ्या संक्रांतीचा वाण.

18- हलव्याच्या दागिन्यांची माळ, आणि सोन्याचा साज,
_________ रावांचे नाव घेते, मकरसंक्रात आहे आज.

19- मकर संक्रांति म्हणून, ठेवला आहे मी उपवास,
_______ रावांचे नाव घेते, आयुष्यभर असुदे त्यांचा सहवास.

20- भावनात जन्मली कल्पना, फुल गुंफिले शब्दांचे,
_______ रावांच नाव घेते, मन राखून सर्वांचे.

21- नवीन वर्षाची सुरवात झाली, संक्रांतीपासून,
_____ रावांसोबत सर्व सण साजरे करेन, आजपासून.

22- आईच्या हाताचे तिळाचे लाडू, खायला येते खूप मज्जा,
________ रावांचे नाव घ्यायला, मला नाही वाटत लज्जा.

23- आज मकर संक्रांत म्ह्णून, मी आले नटून,
_______ आणि_____ ची जोडी दिसते, सर्वात उठून.

24- संक्रांतीच्या सणाला आहे, सुगड्यांचा मान,
______ रावांच्या नावावर देते, हळदी कुंकूच वाण.

25- आज मकरसंक्रांत म्हणुन, दाराला लावले तोरण,
_________ रावांचे नाव घेते, हळदी कुंकवाचे कारण.

26- तिळगुळ दिल्या घेल्याने जातो, नात्यातला कडूपणा,
________ रावांची सौभाग्यवती म्हणून, मिरवण्यात मला वाटतो मोठेपणा.

27- माहेरच्या मायेला, नाही कशाची सर,
_______ रावांच्या सहवासात, न वाटे कसली कसर.

28- आज मकरसंक्रांत म्ह्णून, जेवण केले आहे गोड,
__________ रावांची आहे, मला फार ओढ.

29- देवापुढे ठेवण्यासाठी आणले, नारळ आणि केळी,
______रावांचे नाव घेते, मकरसंक्रातीच्या वेळी.

30-तिळगुळ घ्या, गोड गोड बोला,
______ रावांचे नाव घेते, सर्वांनी कान आणि डोळे खोला.

31- हळद लावते कुंकू लावते, वाण घेते घोळात,
______ रावांचे नाव घेते, सवासनीच्या मेळ्यात.

32- तिळगुळ घ्या, गोड गोड बोला,
_____ राव बोलतात कमी, तोंड खोला.

33- संक्रातीच्या दिवशी, तिळाचे काढते सत्व,
__________ रावांचे नाव घेते, आज हळदी कुंकवाचे महत्व.

34- लग्नानंतर आज आहे, आमची पहिली संक्रांत,
______ रावांचे नाव घेते, सुख समृद्धी येउदे आमच्या संसारात.

35- मकर संक्रांतीला असतो, हलव्याच्या दागिन्यांना मान,
________ रावांचे नाव घेऊन देते, हळदी कुंकूचे वाण.

36- संक्रातीच्या दिवशी, पतंग उडवतात आकाशात,
______ रावांच्या सहवासाने, सुख आले जीवनात.

37- पुराणपोळीला स्वाद येण्यासाठी, घालतात त्यात गुळ,
___________ रावांचे नाव घेऊन, वाटते तिळगुळ.

38- तिळगुळ घ्या, गोड गोड बोला,
______ रावांचे नाव घेण्याचे, सौभाग्य मला.

39- तिळाची माया, गुळाची जोडी,
परमेश्वर सुखी ठेवो, ____ आणि_____ ची जोडी.

40- मराठ मोळे सण, आहेत किती छान,
_______ रावांची पत्नी असण्याचा, मला आहे अभिमान.

41- गुळाने येतो, लाडूला गोडवा,
______ रावांचे नाव घेते, आज सर्वांना संक्रातीला बोलवा.

42- मकर संक्रांतीला, लोक उडवतात पतंग,
_______ रावांची आवड आहे, सत्संग.

43- संक्रांत आहे म्हणून, साऱ्या आल्या नटून,
___________ माझी दिसते, सर्वात उठून.

44- मकर संक्रांत हा, पोंगल म्हणून देखील केला जातो साजरा,
________ रावांचा मला आवडतो, चेहरा लाजरा.

45- तिळाचा लाडू, खायला येते मज्जा,
_______ रावांनी केला, माझ्या मनावर कब्जा.

46- तिळात मिसळला गुळ, त्याचा केला लाडु,
पुढच्या वर्षी, ________च्या पदरात बाळ पाडू.

47- संक्रातीच्या दिवशी, महिला जमल्या हळदी कुंकवाला,
________ रावांचे नाव घेऊन, आली मी तुमच्या स्वागताला.

48- मकर संक्रांतीला, कपडे घालतात काळे,
______ रावांना नेमही सुचतात, कुठेपण चाळे.

49- मोठ्यांचा करावा आदर, मान सन्मान,
_______ रावांच्या नावाने घेते, सौभाग्याचे वाण.

50- प्रेम द्यावे प्रेम घ्यावे, प्रेमाचा असावा साठा,
_______ रावांच्या सुखदुःखात, माझा अर्धा वाटा.

51- एका आठवड्यात, दिवस असतात सात,
______ रावांचे नाव घेते, आज आहे मकरसंक्रांत.

52- आजच्या दिवशी, घरी जमल्या साऱ्या मावशी,
_____ रावांचं नाव घेते, मकरसंक्रांतीच्या दिवशी.

53- काकवी पासून, बनवतात गुळ,
______ रावांचे नाव घेऊन, वाटते तिळगुळ.

54- तिळगुळ आणि तिळाच्या लाडूने, आली संक्रांतीला गोडी,
तुमच्या आशीर्वादाने आनंदी आहे, _______ आणि _____ ची जोडी.

55- मकर संक्रांति म्हणून, सूर्यदेवाने प्रवेश केला मकर राशीत,
_________ रावांना मी सदा, खुश ठेवीन माझ्या कुशीत.

56- मकर संक्रांतीला तीळगूळ वाटणे, आणि पतंग उडवण्याची आहे प्रथा,
_________ रावांसोबत पूजेला बसून, वाचते मी सत्यनारायणाची कथा.

57- मकर संक्रांतीला गंगेत स्नान करून, धुवू सारे दुःख,
________ रावांच्या जीवनात, नेहमी असुदे सुख.

58- ते उडवत होते पतंग, आणि मी पकडली होती फिरकी,
_______ रावांच्या मागे, सात जन्म अशीच घेईन मी गिरकी.

59- तिळाचे लाडू खाऊन, नवीन वर्षाची सुरवात करू गोड,
________ रावांना अशीच असुदे, लहान आणि थोर माणसांची ओढ.

60- मकर संक्रांतीला, काळ्या कापडाला फार आहे डिमांड,
________ राव माझे सर्व हट्ट पूर्ण करा, नाहीतर सर्वांसमोर घेते रिमांड.

61- हलव्याचे दागिने, काळ्या कपड्यावर दिसतात उठून,
सर्वजण विचारतात ________ हॅंडसम, भेटले कुठून.

62- पतंग उडवण्याची प्रथा सुरु केली, भगवान राम आणि हनुमानाने,
________ रावांचे नाव घेते, तुमच्या आग्रहाप्रमाणे.

63- मकर संक्रांत म्हणून, पतंगाने आकाशात घेतली भरारी,
मी घेतली _________ रावांसोबत, आयुष्यभराची सवारी.

64- नवीन वर्ष आणि, आमचा पहिला सण संक्रातीचा
_______ आणि ________ चा जोड़ा राहो, सात जन्माचा.

65- लाडू बनवण्यासाठी, गुळात मिसळले तिळ,
___________ रावांना देऊन बसले मी, पहिल्या भेटीतच दिल.

66- आली आली संक्रांत, घ्या सौभाग्याच वाण,
_________ राव आहेत प्रेमळ, जशी आनंदाची खाण.

67- लज्जेचे बंधन असले तरी, नाव आहे ओठी,
_____ रावांचे नाव घेते, तुमच्या आग्रहापोटी.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

Trending

#Ukhane For Female

गणपती बाप्पा आहेत, शंकर पार्वतीचे सुपुत्र, ___ रावांनी घातले मला, सर्वांसमोर मंगळसूत्र.

#Funny Ukhane

किस किस को अपनी लव स्टोरी कहु, _______आज से तुम______ परिवार की बहु.

#Funny Ukhane

बिझनेस मध्ये झाला, गेल्यावर्षी तोटा, तरीपण ___ रावांनी उडवल्या, लग्नात १०० च्या नोटा.

close