Connect with us

20+ Sakharpuda Ukhane in Marathi | साखरपुडा उखाणे.

sakharpuda ukhane

Sakharpuda Ukhane लग्नाच्या आधी घेतले जातात. साखरपुडा हि महाराष्ट्रामधील परंपरा आहे. जेव्हा एखाद्या जोडप्याचे लग्न ठरते तेव्हा सर्व प्रथम सर्व कुटुंब परिवार मिळून साखरपुडा साजरा केला जातो. येथे तुम्हाला Sakharpuda Ukhane अगदी नवीन भेटतील.

WhatsApp Group Join Now

साखरपुडा म्हणजे लग्नाच्या आधी केलेला कार्यक्रम. या साखरपुड्यात वधू आणि वर दोघे मिळून एक दुसऱ्यासाठी काही उखाणे घेतात आणि ते अत्यंत मजेशीर असतात. उखाणे खूप प्रकारचे आहेत. त्यापैकी साखरपुडा उखाणे हा त्याचा एक भाग आहे.

1- गाऱ्हाणं घालते देवा, मी तुझ्या पायी,
________ रावांना लगीन करण्याची, झाली आहे खूप घाई.

2- साखरपुडा झाला आज, आता लग्न करू जंगी,
_______ रावांची नेहमी साथ असुदे, प्रत्येक वेळ प्रसंगी.

3- चांदण्यांच्या मोहराने, रात्र केव्हा दाटली,
सर्वांच्या म्हणण्याप्रमाणे,__________ रावांना अंगठी घातली.

4- विडा, सुपारी, फुल, पेढे आणि साखरेने भरले ताट,
____ रावांनी अंगठी घालून केली, साखरपुड्याची सुरवात.

5- साखरपुडा आहे आमचा _____ तारखेला सर्वांना कळवले,
___ रावांनी अखेर, माझ्या घरच्यांना मनवले.

6- झाला साखरपुडा, ग बाई थाटाचा,
कारण ________ रावांनी आणला, शालू जरी काठाचा.

7- मला तुझ्या प्रेमाची, लागली आहे चाहूल,
______ रावांचे नाव घेऊन, सासू सासऱ्यांचे पडते पाऊल.

8- काचेची बांगडी, केसा पेक्षा बारीक,
_____ रावांचे नाव घेते, आज आहे साखरपुड्याची तारीख.

9-______ आणि ______ चि जमली, आता जोडी,
आज साखरपुडयाच्या दिवसाची, वाढवा सर्वानी गोडी.

10- काचेच्या बशीत, ठेवली बर्फी,
_______ रावांचे नाव ऐकण्यास, खूप झाली गर्दी.

11- लग्नाच्या आधी, पहिला असतो साखरपुडा,
________ रावांच्या नावाने, भरला हिरवा चुडा.

12- समुद्राच्या पाण्यात पडते, सूर्याचे प्रतिबिंब,
_______ रावांचे नाव घेण्यास, मी करत नाही विलंब.

13- फुलाची माळ घालते, गणपती बाप्पाच्या गळी,
__________ रावांचे नाव घेते, साखरपुडयाच्या वेळी.

14- मागवा आज, भरपूर पेढ्यांचा पुडा,
कारण ____ आणि_____ चा आहे आज साखरपुडा.

15- साखरपुड्याची साखर, सर्वांना वाटली,
आणि _____ रावांचे नाव घ्यायला, मला नाही लाज वाटली.

16- भरजरी हिरवी साडी घालून, हातात घातली रिंग,
मी त्यांची आजपासून क्वीन, आणि _______ माझे किंग.

17- हातावर मेहंदी, आणि हिरव्या बांगड्यांचा चुडा,
________रावांसोबत झाला, अखेर साखरपुडा.

18- हृदयात दिले स्थान, तेव्हा दिला हातात हात,
______ च्या जीवनात लाविली मी, प्रीतीची फुलवात.

19- नव्या नवरीला शोभतो, हिरव्या बांगड्यांचा चुडा,
______ आणि______ चा आहे आज साखरपुडा.

20- श्रावण महिण्यात दिसते, इंद्रधनुची रंगत न्यारी,
___________ आहे मला, सर्वात प्यारी.

21- नाण्याच्या दोन बाजू, छापा आणि काटा,
_________ रावांसोबत साखरपुडा झाला, आता पेढे वाटा.

22- मंगल मणी हे, शोभत कंठी,
_______ रावांचे नाव घेऊन, घालते अंगठी.

आणखी वाचा- Gruhpravesh Ukhane in Marathi | गृहप्रवेश उखाणे मराठी. <—-क्लीक करा.

Categories

Trending

#Ukhane For Female

गणपती बाप्पा आहेत, शंकर पार्वतीचे सुपुत्र, ___ रावांनी घातले मला, सर्वांसमोर मंगळसूत्र.

#Funny Ukhane

किस किस को अपनी लव स्टोरी कहु, _______आज से तुम______ परिवार की बहु.

#Funny Ukhane

बिझनेस मध्ये झाला, गेल्यावर्षी तोटा, तरीपण ___ रावांनी उडवल्या, लग्नात १०० च्या नोटा.

close