Connect with us

50+ Satyanarayan Pooja Ukhane in Marathi | सत्यनारायण पूजा उखाणे.

satyanarayan pooja ukhane

Satyanarayan Pooja Ukhane हे जेव्हा दोन जोडपे जे पूजेला बसतात त्यांना घ्यावे लागते. सत्यनारायणाची पूजा संपूर्ण भारतामध्ये केली जाते. लग्ना नंतर बहुतेक जणांच्या घरी हे हि पूजा केली जाते. सत्यनारायण पूजेचे खूप महत्व आहे. हि पूजा सर्व ठिकाणी केली जाते

WhatsApp Group Join Now

मोठ्या कार्यालयात , सोसायटी मध्ये , दुकानांमध्ये देखील हि पूजा घातली जाते. सत्यनारायण पूजेला खूप मानले जाते. हे उखाणे तुम्ही कुठेही शेयर करू शकता. Satyanarayan Pooja Ukhane तुम्हाला इंटरनेट वर फार कमी मिळतील. या वेबसाईटवर तुम्हाला सर्व प्रकारचे उखाणे मिळतील.

1- जाता पंढरीस, सुख वाटे जिवा,
___________ रावांसोबत जोडीने, देवापुढे लावते दिवा.

2- _________ तुझ्याचसाठी मी, हे गीत गाते,
सत्यनारायण देवाचे नाव घेऊन, फुले वाहते.

3- तुझ्या माझ्या संसाराला, आणखी काय हव,
_______ आई बाबांची ईच्छा आहे, बांधा १ घर नव.

4- होम पेटे त्यात, वाईट गोष्टी आणि दुःख सारे जाळते,
_______ रावांचे नाव घेऊन, सत्यनारायण देवाला ओवाळते.

5- माय बाप सेवा, पवित्र हे कर्म,
_______ रावांचे नाव घेते, हिंदू हाच खरा धर्म.

6- आज आहे, श्रावणी पोळा,
________ रावांच्या जीवावर, शृंगार केले सोळा.

7- वसंत ऋतू मध्ये, कोकिळा करते गुंजन,
_____ रावांसोबत करते मी, सत्यनारायणाचे पूजन.

8- पूजेला ठेवले आहे, भात आणि वरण,
____ रावांचे नाव घ्यायला आहे, सत्यनारायण पूजेचे कारण.

9- सत्यनारायणाला, नमस्कार करते जोडीने,
_______ रावांचे नाव घेते, सदा आवडीने.

10- पावसाळ्यात आकाशात, कडकडतात विजा,
____ रावांसोबत करते आज, सत्यनारायणाची पूजा.

11- गोंड्याचा हार, कंदीचे पेढे,
______ रावांचे नाव घेते, सत्यनारायणापुढे.

12- देवाची आरती करताना, अंगात येते ऊर्जा,
______ रावांसोबत करते मी, सत्यनारायणाची पूजा.

13- सत्यनारायण देवाला, हार घालते वाकून,
_______ रावांचे नाव घेते, तुमच्या सर्वांचा मान राखून.

14- सूर्य प्रकाशाने येते, पृथ्वीवर ऊर्जा,
_______ रावांसोबत करते, सत्यनारायणाची पूजा.

15- काचेच्या अलमारीत, गणपतीची मूर्ती,
_______ बसली पूजेला, मी करतो आरती.

16- आता मी आहे, दोन मुलांची आई,
_____ रावांसोबत सत्यनारायण पूजेला बसण्याची, मला खूप घाई.

17- सत्यनारायण पूजेला बसण्याचा, मिळाला आम्हाला मान,
_______ रावांसोबत माझा संसार, असाच राहूदे छान.

18- सत्यनारायणासमोर मागणे मागते, सर्वांना मिळूदे चांगले आरोग्य,
________ रावांच्या रूपात भेटला, मला जीवनसाथी योग्य.

19- साई बाबांच्या चरणी, कीर्तन चालते मजेत,
______ रावांचे नाव घेते, सत्यनारायणाच्या पूजेत.

20- पूजेला बसणार म्ह्णून, घातला सदरा,
______ रावांनी आणला मला, मोगऱ्याचा गजरा.

21- पूजेला जमले, सारे घर सोबती,
_____ रावांसोबत करते, सत्यनारायणाची आरती.

22- सत्यनारायण पूजेला, बसलो दोघे जोडीने,
______ रावांचे नाव घेते, सदा आवडीने.

23- पूजेसाठी काढली रांगोळी, आणि दरवाजाला लावले तोरण,
_____ रावांचे नाव घेते, सत्यनारायण पूजेचे कारण.

24- हरतालिकेनंतर येते, गणेश चतुर्थी,
________ रावांसाठी आहे मी, नेहमी आतुरती.

25- सौभाग्यवती करतात, गौराईची पूजा,
_________ रावांचे नाव घेऊन, घेते मी रजा.

26- श्रावण महिनेच्या सुरवातीला येतात, गौरी गणपती,
_____________ राव आहेत माझे, प्रेमळ पती.

27- श्रावणात येतो, पर्जन्य वृष्टीला जोर,
________ रावांसारखे पती मिळण्यासाठी, भाग्य लागते थोर.

28- देवापुढे ठेवले, प्रसादाचे ताट,
________ रावांमुळे भेटली, माझ्या आयुष्याला वाट.

29-आज सोसायटीमध्ये आहे, सत्यनारायणाची पूजा,
_____________ रावांचे नाव घेताना, येते मला ऊर्जा.

30- देवापुढे लावली, समईची जोडी,
_________ रावांमुळे आली, माझ्या आयुष्याला गोडी.

31- निवद बनवलेला, देवापुढे ठेवते,
______ रावांसाठी, दीर्घायुष्य मागते.

32- शंकरासाठी पार्वतीने, तपस्या उग्र केली,
__________ रावांनी मात्र मला, पाहता क्षणीच पसंती केली.

33- महाराष्ट्राची परंपरा म्हणजे, मंगळागौरीचा खेळ,
__________ रावांचे नाव घेते, सत्यनारायणाची वेळ.

34- झिम्मा खेळून, फुगडी घालून, खूप बाई दमले,
पूजेचे जागरण संपताच, मन _______ रावांकडे धावू लागले.

35- श्रावणात हिरवा साज, सृष्टिदेवी सजली,
_________ रावांच्या सौख्यास्तव, मंगळगौर पुजली.

36- सुखी संसारासाठी, सर्वांनी झटावे,
_________ रावांचे नाव घेण्यास, मागे का हटावे.

37- पूजेला नटण्यासाठी, बायका असतात खूप हौशी,
_________ रावांचे नाव घेते, सत्यनारायण पूजेच्या दिवशी.

38- रातराणीच्या सुगंधाने, मन झाले मोहित,
________ रावांना आयुष्य मागते, सासू -सासर्‍यांना सहित.

39- आज आहे चाळीत, सत्यनारायणाचा गजर,
__________ रावांचे नाव घेताना, सगळे आहेत हजर.

40- तूच करता, आणि तूच करविता,
_________ रावांचे नाव घेते, शरण तुला भगवंता.

41- ऋतू सोबतीने, सारी जुनी झाडे नवी होता,
_________ रावांसोबत वाचेन मी, सत्यनारायणाची कथा.

42- सासूबाईंनी ठेवले, खूप खुश सुनेला,
_____ रावांसोबत बसेन आज, सत्यनारायणाच्या पूजेला.

43- गणपती बाप्पाला आवडती, तलावातील कमळे,
________ रावांसोबत, माहेर विसरून रमले.

44- श्रावणात महादेवाला, दुधाचा अभिषेक,
_______ रावांच्या नावाने, बेल वाहिले एकशे एक.

45- सत्यनारायणाच्या पूजेने करू, नवीन कार्याची सुरवात,
_______ रावांचे नाव घेऊन, देवापुढे लावते फुल-वात.

46- बहुतेकांनी वाचले असेल, पुस्तक रामायण,
____ रावांचे नाव घेते, आज आहे सत्यनारायण.

आणखी वाचा—-> हळदी कुंकू उखाणे <——-क्लिक करा.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

Trending

#Ukhane For Female

गणपती बाप्पा आहेत, शंकर पार्वतीचे सुपुत्र, ___ रावांनी घातले मला, सर्वांसमोर मंगळसूत्र.

#Funny Ukhane

किस किस को अपनी लव स्टोरी कहु, _______आज से तुम______ परिवार की बहु.

#Funny Ukhane

बिझनेस मध्ये झाला, गेल्यावर्षी तोटा, तरीपण ___ रावांनी उडवल्या, लग्नात १०० च्या नोटा.

close