Ukhane For Female

Trending Ukhane Marathi

Ravi
Trending Ukhane Marathi

Trending Ukhane Marathi हे उखाणे तुम्हाला इंटरनेटवर फार कमी मिळतील. या वेबसाईटमध्ये तुम्हाला खूप प्रकारचे उखाणे मिळतील. उखाणे हे प्रत्येक नवीन वधू वर घरात प्रवेश करताना घेतात आणि तुम्ही कोणाच्यातरी लग्नात पाहिले असेलच. उखाणे घेणे हे महाराष्ट्रातील लग्नातील परंपरा आहे आणि हे परंपरा पण कायम ठेवली पाहिजे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात घरोघरी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत.

Trending Ukhane Marathi हे अगदी नवीन आहेत. तुम्हाला हे उखाणे नक्की आवडतील. हे उखाणे जर तुम्हाला आवडले असेल तर नक्की आपल्या मित्र परिवारांसोबत शेयर करा. तुम्ही या वेबसाईटमधील इतर पोस्ट देखील चेक करा ज्याणेकरून तुम्हाला नवीन उखाणे बघण्यास मिळतील.

1- कोणत्या स्वप्नात बघितले, हिला मी अशी,
__________________ तू मला हवीस, जशी आहेस तशी.

2- लग्नाच्या आधी फोनवर, संपत नव्हती रात,
________________ रावांशी आजपासून, समोरासमोर होईल बात.

3- गळ्यात तुझ्या, शोभून दिसतोय दागिना,
________________ मला सोडून, दुसरीकडे कुठे पाहीना.

4- अन्न, वस्त्र आणि राहण्यासाठी हवा निवारा,
_____________ रावांमुळे, माझ्या आयुष्याला भेटला सहारा.

5- घर हे अधुरे आहे, जिथे नाही आईची छाया,
__________ च नाव घेतो, आई सारखीच असुदे तुझी माझ्यावर माया.

6- तनमनाच्या मंदिरी या, जागवूया चेतना,
_________ आणि ____________ ची जोडी खुश राहो, यासाठी देवाकडे करतो मी प्रार्थना.

7- कष्टाविना कोणतेही, फळ नाही मिळत,
____________________ रावांचे नाव घेते, संसार काय आहे केल्यावरच कळत.

8- गंध हा, श्वास हा, स्पर्श तुझा सांगतो,
_______________ सारखी प्रेमळ पत्नी भेटली, देवाचे आभार मानतो.

9- मी घरी आली आता, राज्य तुमचे संपले,
______________ रावांचे नाव घेते, मी सासू सासऱ्यांचे मन जिंकले.

Ravi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *