
जीवनसाथीवर पाठवली होती, यांनी रिक्वेस्ट, परंतु _____________ रावांना केले मी, आयुष्यभरासाठी एकसेप्ट.

जडतो तो जीव, लागते ती आस, ___________ रावांना केले मी, बघण्याच्या कार्यक्रमातच पास.

पैठणी घालण्यासाठी, मी फार आहे हौशी, ________ रावांचे नाव घेते, होम मिनिस्टरच्या दिवशी.

नव्या नवरीला शोभतो, हिरव्या बांगड्यांचा चुडा, ____ आणि ___ चा आहे आज साखरपुडा.

इंस्टाग्रामच्या बायोला, टाकला आहे फुडी, ____ राव आहेत खूप मुडी.

आमच्या लग्नासाठी, नाही केला कोणी अपोज, ___ला मारतो आज, सगळ्यांसमोर प्रपोज.

आहे मी प्रेमळ, नाही मला कोणाचा द्वेष, ___रावांचं नाव घेऊन, करते गृहप्रवेश.

आजच्या कार्यक्रमात, जमल्या साऱ्या हौशी, ___रावांचे नाव घेते, डोहाळे जेवणाच्या दिवशी.

आजचा दिवस आहे, आमच्यासाठी खास, ___ रावांना भरवते मी, गुलाबजामूनचा घास.

तो सीमेवर लढत असतो, म्हणून आपण शांत झोपतो सर्व, ___आहेत फौजी, म्हणून आहे मला गर्व.

हिंदवी स्वराज्य स्थापन केले, छत्रपती शिवाजी महाराजांनी, ____ आपण संसाराची सुरवात, करूया सर्वांच्या आशीर्वादांनी.

तू दिसतेस खूप सुंदर साडीवर, ___तुला बायको बनवून फिरवेन गाडीवर.