Connect with us

Police Ukhane Marathi | पोलिस कर्मचारांसाठी उखाणे

Police Ukhane Marathi

Police Ukhane Marathi हे खास आपल्या पोलिस वधू वरांसाठी लिहिले आहेत. पोलिसांमुळे आज आपण सर्व आपल्या घरी असतो सुरक्षित. ते सण वार साजरे न करता दिवस रात्र देत असतात पहारा. त्यांच्या या कर्तुत्वाला प्रत्येक भारतीय नागरिकाने सॅल्यूट केला पाहिजे.

WhatsApp Group Join Now

पोलिसांमुळे आज एक स्त्री रात्री अपरात्री बाहेर पडू शकते कोणालाही न घाबरता. Police Ukhane Marathi हे तुम्हाला आवडल्यास तुम्ही तुमच्या मित्र परिवारांसोबत नक्की शेयर करा आणि असेच उखाणे बघण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट देत रहा.

1- आपण सुरक्षित राहो, म्हणून पोलीस दिवसरात्र ठेवतात पहारा,
___________________ रावांचा भेटला मला, आयुष्यभरासाठी सहारा.

2- पोलिस भरतीला, झाली आमची भेट,
_____________ ला आणली घरी अखेर, पत्नी म्हणून थेट.

3- पोलिस नोकरी करताना, सण-वार नाही करता येत साजरे,
_____________ राव आहेत PSI, परंतु आहेत खुप लाजरे.

4- पोलिस बनायच असेल, तर लागते फार जिद्द,
माझ __________ वर किती प्रेम आहे, ते आज झाले सिद्ध.

5- पोलिस भरतीचा अभ्यास करण्यासाठी, मी निवडले पुणे शहर,
_____________ पुण्याचीच होती, म्हणून मला लागली तिची लहर.

6- पोलिस असतात रागीट, म्हणून मला वाटत होती भिती,
परंतु __________ रावांना डेट करताना, खरी समजली स्थिती.

7- परीक्षेचा निकाल काय लागले, यामुळे जीव होता खाली वरती,
अखेर _________________ रावांची झाली, २०२३ ला पोलिस भरती.

8- आयुष्यात एक स्वप्न होते कि, अंगावर पाहिजे खाकी,
पाहिजे तसा जोडीदार ___________ मिळाला, नाहि राहिले काहि बाकी.

9- पोलिस भरतीसाठी तरुणांना, फार असते वेड,
___________ ची Personality बघून, झाले मी Dead.

10- पोलिस बनण्यासाठी, लागतात खूप कष्ट,
___________ रावांचे नाव घेते, सर्वांसमोर स्पष्ट.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

Trending

#Ukhane For Female

गणपती बाप्पा आहेत, शंकर पार्वतीचे सुपुत्र, ___ रावांनी घातले मला, सर्वांसमोर मंगळसूत्र.

#Funny Ukhane

किस किस को अपनी लव स्टोरी कहु, _______आज से तुम______ परिवार की बहु.

#Funny Ukhane

बिझनेस मध्ये झाला, गेल्यावर्षी तोटा, तरीपण ___ रावांनी उडवल्या, लग्नात १०० च्या नोटा.

close