Ukhane For Male

Gents Ukhane Marathi | मराठी उखाणे नवरदेवासाठी

Ravi
Gents Ukhane Marathi

Gents Ukhane Marathi हे खास पुरुषांसाठी लिहिले गेले आहेत असे उखाणे तुम्हाला इंटरनेटवर फार कमी बघायला मिळतील उखाणे घेणे हे फार मजेशीर असते परंतु ते वेळेवर सुचत नाहीत.

Gents Ukhane Marathi हे अतिशय सोपे आणि मजेशीर आहेत जे तुमच्या होणाऱ्या पत्नीला नक्कीच आवडतील आणि पाहुणे मंडळी देखील खुश होतील. ही वेबसाईट खास करून उखाणे साठीच आहे. जर तुम्हाला हे उखाणे आवडले असतील तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा.

1- लग्न म्हणजे, दोन जीवांनी मिळून जगणे,
________________ मला पसंत पडली, कारण तिचे आवडले मला वागणे.

2- मोल श्रमाचे, सर्वांना कळू दे,
________ ला बघून, जळणाऱ्यांची जळूदे.

3- माथ्यावरूनी सावरूनी, पदर घेतला नीट,
____________ दिसते साधी, पण आहे खूप धीट.

4- चहू बाजूला, निळसर डोंगर,
_____________ दिसते, सर्वात सुंदर.

5- इवल्याश्या नाकावर, मोठा आहे राग
_________ तुला काय हवे, ते लवकर माग.

6- कपाळावर कुंकू हि, सौभाग्याची खूण,
_______ च नाव घेतो, आवडली का तुमची सून.

7- तुझी माझी, प्रीत जमली नदीकाठी,
देवा ___________ मला भेटूदे, ७ जन्मासाठी.

8- समान येथे सारे मानव, धर्म जातीचा भेद नसो,
__________________ माझ्या संसारात, आनंदाने वसो.

9- 30 च्या आत लग्न, करायची होती इच्छा,
_________ आणि _________ ला द्या, तुमच्या सर्वांकडून शुभेच्छा.

10- कोकणामध्ये आहेत, आंबे आणि माडांची झाडी,
____________ च नाव घेतो, आवडली का आमची वाडी.

Ravi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *