मकर संक्रांति म्हणून, सूर्यदेवाने प्रवेश केला मकर राशीत,  _____ रावांना मी सदा, खुश ठेवीन माझ्या कुशीत.

मकर संक्रांतीला तीळगूळ वाटणे, आणि पतंग उडवण्याची आहे प्रथा, _____ रावांसोबत पूजेला बसून, वाचते मी सत्यनारायणाची कथा.

 मकर संक्रांतीला गंगेत स्नान करून, धुवू सारे दुःख, _____ रावांच्या जीवनात, नेहमी असुदे सुख.

मकर संक्रांत हा, पोंगल म्हणून देखील केला जातो साजरा, _____ रावांचा मला आवडतो, चेहरा लाजरा.

तिळाचे लाडू खाऊन, नवीन वर्षाची सुरवात करू गोड, _______ रावांना अशीच असुदे, लहान आणि थोर माणसांची ओढ.

मकर संक्रांतीला, काळ्या कापडाला फार आहे डिमांड, _____ राव माझे सर्व हट्ट पूर्ण करा, नाहीतर सर्वांसमोर घेते रिमांड.

हलव्याचे दागिने, काळ्या कपड्यावर दिसतात उठून, सर्वजण विचारतात _____ हॅंडसम, भेटले कुठून.

पतंग उडवण्याची प्रथा सुरु केली, भगवान राम आणि हनुमानाने, ______ रावांचे नाव घेते, तुमच्या आग्रहाप्रमाणे.  

नवीन वर्ष आणि, आमचा पहिला सण संक्रातीचा ____ आणि___ चा जोड़ा राहो सात जन्माचा.

आणखी वाचा 

Arrow