Ukhane For Male

Sope Ukhane Navardev | सोपे उखाणे नवरदेव

Ravi
Sope Ukhane Navardev

Sope Ukhane Navardev हा खास नावरदेवसाठी लिहिले गेले आहेत. हे उखाणे तुम्हाला इंटरनेटवर फार कमी मिळतील. या वेबसाईटच्या माध्यमातुन आम्ही तुम्हाला नवीन उखाणे देण्याचा प्रयत्न करत आहोत. उखाणे घेण्याची परंपरा महाराष्ट्रात फार जुनी आहे. हि परंपरा आपण कायम ठेवूया.

Sope Ukhane Navardev जर तुम्हाला आवडले असतील तर नक्की सर्वांसोबत शेयर करा. या वेबसाईटवर भरपूर उखाणे आहेत नक्की चेक करा. अशाच नवीन उखाण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट देत रहा.

1- निसर्ग सारा फुलून आला, वाट तुझी पाहे,
____________ आयुष्यात येण्याने, आनंद बहरून वाहे.

2- सासरवाडीतिल मंडळींच्या डोळ्यात, झालीय आसवांची दाटी,
कारण ________________ ने सोडले माहेर, माझ्यासाठी.

3- तुझ्या हाताने माझे, पुढचे भविष्य घडेल,
______________ सोबत असताना, कोणाची गरज नाही पडेल.

4- हा भास आहे कि सत्य, काहीच नाही कळत,
___________ आयुष्यात आल्यापासून, माझ पानही नाही वळत.

5- मिळते का हो शोधून, कुठे परी,
____________ च्या रूपात, लक्ष्मी आली घरी.

Sope Ukhane Navardev For Marriage

6- विश्वास न्हवता माझा, नशिबावर कधी,
______________ सारखी बायको येईल, माझ्या आयुष्या मधी.

7- या पावसालाच साक्षी ठेवून, आपण केल होत प्रेम,
अखेर आजपासून ______________ तुझ्या नावापुढे, माझे लागेल नेम.

8- माझ मन थाऱ्यावर, नाही आहे आज,
कारण ___________ चा आज, सुंदर बघून साज.

9- तुझ्या येण्याने आयुष्यात, भरले हे रंग,
____________ सोबत आजपासून, होईल मी दंग.

10- तुझा चांगुलपणा, पहिल्या भेटीतच कळला,
दुसरे स्थळ न बघता, ____________ हा दिल तुझ्यामागेच वळला.

11- साक्षात स्वर्गाची, मेनका तू जणू,
_____________ च नाव हृदयात कोरलंय, आणखी काय म्हणू.

12- निळ्या आभाळात, चंद्र हसतोय,
_________ ची स्माईल बघून, मी फसतोय.

Ravi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *