Radha Krishna Ukhane हे तुम्हाला नक्की आवडतील जर आवडल्यास सर्वांसोबत शेअर करा. Radha Krishna ची जोडी तर आपण सर्वांना आवडते. त्यांच्यासारखी जोडी भेटणे अशक्य आहे. हे उखाणे तुम्हाला इंटरनेटवर कुठेच भेटणार नाही. अशाच नवीन नवीन उखाण्यांसाठी आमच्या वेबसाईटला नेहमी भेट द्या. उखाणेसाठी महाराष्ट्रातील हि नंबर १ वेबसाईट आहे.
1- गोपिकाचा नंदलाला, गोकुळ त्याचे गाव,
सर्वांना नमस्कार करते घेऊन,__________ रावांचे नाव.
2- मथुरा नगरी झाली दंग, पाहून कृष्णाची खोडी,
________ रावांचे नाव घेते, आवडली का आमची जोडी.
3- पूर्ण आहे श्रीकृष्ण, परिपूर्ण आहे राधा,
__________ ला खुश ठेवेन, याचा करतो मी वादा.
4- रंगरूप न बघता, राधेने कृष्णावर केले प्रेम,
आजपासून माझ्या नावाच्या पुढे, _______ रावांचे लागले नेम.
5- श्रीकृष्ण काढत असे, राधेची छेड,
तसेच ________ रावांना लागले, माझे वेड.6- वृंदावनात श्रीकृष्ण, आणि राधेची झाली भेट,
आणि _______ मला, कॉलेज मध्ये झाली सेट.
7- पिवळी चोळी ती साधीभोळी, वेश तिचा साधा,
______________ रावांचे नाव घेते, आवडली का ही राधा.8- सावळा कृष्ण, सुंदर राधिका, प्रेमाची हि कहाणी,
____________ राव आहेत माझ्यासाठी राजा, आणि मी त्यांची राणी.9- प्रेमाची ती अधुरी कहाणी, जन्माची ती सखी,
___________ राव आहेत माझ्यासाठी, फार लकी.

