Ukhane For Female

Modern Marathi Ukhane for Female | Modern Ukhane

Ravi
modern marathi ukhane

Modern marathi ukhane हे आताच्या पिढीसाठी खास बनवले गेले आहेत. हे उखाणे अगदी नवीन असून तुम्हाला फार आवडतील. उखाणे घेणे हि महाराष्ट्राची परंपराच आहे. इंटरनेटवर तुम्हाला उखाणे भेटतील परंतु ह्या वेबसाईटसारखे उखाणे तुम्हाला कुठेच भेटणार नाहीत.

Modern marathi ukhane हे आताच्या जोडप्यांना फारच आवडतील. हे उखाणे अगदी सोपे आहेत वाचायला. तुम्हाला घेताना फार मज्जा येईल.

1- समुद्राच्या किनारी, पांढरी शुभ्र वाळू,
________ रावांच्या यशासाठी, सर्व उपवास पाळू.

2- आमच्या दोन्ही परिवाराचा, लग्नासाठी आला हो,
________ राव आहेत, आजपासून माझे घो.

3- पावसाळ्याची सुरवात, आणि कोकिळा गाते गाणी,
आजपासून झाले मी, ________ रावांची राणी.

4- वाईट वेळ आली तर, सर्वजण जातात पळून,
______ राव सोबत असतील तर, नाही बघणार मागे वळून.

5- आमचे लग्न ठरताना, आल्या फार अडचणी,
तरीसुद्धा ________ रावांनी सोडली नाही आशा, एकाही क्षणी.

6- प्रेम आहे कोणावर तर, शेवट पर्यंत करा,
________ रावांच्या येण्याने, आयुष्याला अर्थ मिळाला नवा.

7- जात बघून मोडू नका लग्न, मानव जात हाच आहे एक धर्म,
________ रावांसोबत लग्न करून, माणुसकीचा हेतू झाला पूर्ण.

8- आई वडिलांच्या कृपेने, सर्व काही आहे माझ्याकडे,
________ रावांसोबत संसारात, यशस्वी पाऊल पडुदे पुढे.

9- इंग्लिश नीट येत नव्हती, पण झाली आहे आता सुधार,
_________ राव शेवट पर्यंत बनुया, एकमेकांचा आधार.

10- नवी कोरी साडी आहे, लाख मोलाची,
परंतु आहे मी फॅन, ______ रावांच्या मधुर बोलाची.

11- एक दुसऱ्याला समजून घेणे, हेच आहे खरे प्रेम,
________ राव सोबत असताना, नाही मला कोणाशी लेन देणं.

12- प्रेम म्हणजे सुंदर पहाट, कधीही न हरवणारी जीवनाची वाट,
__________ रावांसोबत अशीच असुदे, साता जन्माची गाठ.

13- येवडा भोळेपणा, पाहिला नाही मी कोनात,
_______ साठी जीवापाड प्रेम आहे, माझ्या मनात.

14- आहे मी बारिक, सगळे बोलतात हाडाची काडी,
________ रावांची ईच्छा आहे, लग्नानंतर मी घालावी साडी.

15- चिकन सुपारी, फोडावी दाताने,
________ रावांचे काकण सोडावे, उजव्या हाताने.

16- हळद लागल्यामुळे, अंग झाले पिवळे,
________ रावांचे रूप, श्रीकृष्णासारखे सावळे.

17- आयुष्यातला तो क्षण किती छान असतो,
जेव्हा ________ रावांचा हात माझ्या हातात असतो.

18- हसायच खेळायच, सर्व काही करायच,
_________ रावांचे नाव घ्यायला, कशाला लाजायच.

19- असा असावा सुखी संसार, जिथे दूर्दयवाला घ्यावी लागेल माघार,
______________ राव आहेत माझ्या, जीवनाचा आधार.

20- जेठालाल ची बायको असून, फेवरेट आहे बबिता,
_________ रावांचे नाव घेते, माझे नाव सरिता.

21- पुण तिथे काय उण, म्हणतात सारी जण,
मुंबई च्या लोकांसारखेच आहे, _______ रावांचे मोठे मन.

22- आधार कार्डवर यांचा, फोटो आहे खूप घाण,
पण _______ राव दिसतात, समोर खूप छान.

23- सारख्या आहेत, आमच्या दोघांच्या राशी,
______ रावांचे नाव घ्यायला, नाही म्हणू कशी.

24- फळांचा राजा म्हणजे, हापूस आंबा,
_______ रावांचे नाव घेते, सर्वांनी थांबा.

Ravi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *