Ukhane For Male

Marathi Ukhane for Groom | Navardev Ukhane.

Ravi
marathi ukhane for groom

Marathi Ukhane For Groom हे खास पुरुषांसाठी आहेत. हे उखाणे तुम्ही आपल्या जोडीदारासाठी घेऊ शकता. हे वाचायला आणि समजायला अगदी सोपे आहेत. लग्नकार्यात उखाणे घेणे खूप महत्वाचे आहे. उखाणे शिवाय लग्न अपूर्ण आहे.

या वेबसाईट वर Marathi Ukhane For Groom नवीन प्रकारचे मिळतील. हे उखाणे डाउनलोड आणि शेयर करण्यास खूप सोपे आहे. उखाणे घेणे हि लग्नातील परंपरा आहे.

1-सोनार त्याची कला दाखवतो, सोन्याच्या साखळीवर,
_________ चे नाव लिहितो मी, हृदयाच्या पाकळीवर.

2- तुझ हसण तुझ लाजण, फुलांपेक्षा कमी नाही,
________ तुझ्या प्रेमात कधी पडलो, हे मला कळलच नाही.

3- पुरणपोळी बनवतात, साजूक तुपात,
काहीतरी जादू आहे _____ च्या रूपात.

4- नेहमी तुला आनंदी ठेवण्याची, देतो मी हमी,
______तुला आजपासून, नसेल कसली कमी.

5- कोकणात असतात, गणपती बाप्पा घरोघर,
_____ झालीस माझी, चल आता हात पकडून बरोबर.

6- एसी ची हवा येते, थंड थंड कूल,
_________ माझी नाजूक, जसे गुलाबाचे फूल.

7- लोणावळा मध्ये फेमस आहे, पावना लेक,
______ आहे माझी, एकुलती एक.

8- पुण्यात आहेत, मुली १०१.
परंतु ______ आहे माझी, लाखात एक.

9- घराच्या अंगणात झोपून, दिसे शरदाचे चांदणे,
_________ चे रूप आहे, चंद्रासारखे देखणे.

10- रसाळ पाहिजे वाणी, स्त्री पाहिजे निर्मळा,
_______ च्या नावाचा, मला लागला जिव्हाळा.

मराठी उखाणे नवरदेवासाठी

11- शिवारात गाऊ चल, प्यार वाली गाणी,
______ तू बनशील का, माझ्या दिलाची राणी.

12- मी आहे साधा, सरळ,
_____ आहे माझी खूप प्रेमळ.

Ravi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *