Ukhane For Male

Marathi Ukhane For Couple

Ravi
Marathi Ukhane For Couple

Marathi Ukhane For Couple हे दोन्ही महिला आणि पुरुषांसाठी लिहिले गेले आहेत. या वेबसाईट मध्ये तुम्हाला भरपूर प्रकारचे नवीन उखाणे बघण्यास मिळतील. या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यात पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत.

Marathi Ukhane For Couple हे खूप सोपे आणि मजेशीर आहेत. हे उखाणे जर तुम्ही कोणत्याही कार्यक्रमात घेतले तर पाहुण्यांना नक्की आवडतील आणि तुम्ही इतरही पोस्ट या वेबसाईट मधल्या चेक करा ज्यामुळे तुम्हाला भरपूर उखाणे मिळतील. तुम्हाला जर हे उखाणे आवडले असतील तर नक्की आपल्या मित्र परिवारांसोबत शेअर करा.

1- आयुष्यात कळत नकळत, सारे घडले,
आणि ___________ राव मला बघताच, प्रेमात पडले.

2- ह्या नजरेला सतत असते, तुझीच वाट,
_____ रावांसोबत नाते जुळल्याने, समजत नाही कधी होते पहाट.

3- आई बाबांचा विरोध करून, मी पडले यांच्या प्रेमात,
____________ राव मला कधीही, एकटे सोडू नका या जगात.

4- कितीही संकटे आली परंतु, आम्ही घेतली नाही माघार,
_________________ मुळे भेटला माझ्या, आयुष्याला आधार.

5- तुझेच नाम ओठी, ध्यान मी स्मरावे,
___________ ची ईच्छा होती, मी तिच्यावर आयुष्य कुर्बान करावे.

Marathi Ukhane For Couple Online

6- रम्य दिसे आज नजारा, नक्षत्राची सांगे नक्षी,
____________ चे नाव घेतो, सर्वजण आहेत साक्षी.

7- दोन देह विरघळले, होऊनी एक स्पंदने,
_____________ रावांचे नाव घेते, जोडुनी नवी बंधने.

8- चिंब भिजून पावसात, मन जाऊन बसत ढगात,
___________ रावांचा आधार भेटला मला, या सुंदर जगात.

9- एवढी कशी झाली माझ्या मनावर, तुझ्या शृंगाराची जादू,
____________ फार गोड आहे, तिच्यावर संसाराचे ओझे कसे लादू.

10- थोडीशी आपुलकी, थोडासा विश्वास,
_________ सोबत सुरु झाला आजपासून, संसाराचा प्रवास.

11- हिला मिळवण्यासाठी, मी सोडली नाही कोणती कसर,
______________ ला पहिल्यांदा बघितले होते, तेव्हाच झाला मला तिचा असर.

Ravi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *