Easy Marathi Ukhane हे वधू आणि वरांसाठी खास लिहिले गेले आहेत. हे उखाणे अगदी सोपे आहेत जे तुम्ही लग्नकार्यात घ्याल तर सर्वांना आवडतील. सध्या उखाणे इंटरनेटवर फार आहेत परंतु आम्ही आमच्या वेबसाईटच्या माध्यमातून नवीन उखाणे देण्याचा प्रयत्न करत आहोत.
Easy Marathi Ukhane जर तुम्हाला आवडले तर नक्की तुमच्या मित्र परिवारांसोबत शेयर करा. या वेबसाईटवर भरपूर उखाणे आहेत तुम्ही नक्की चेक करा.
1- जोडीदार चांगला मिळावा, यासाठी लागते खूप भाग्य,
__________ रावांसोबत लग्न होऊन, आज स्वप्न झाले साध्य.
2- पुणेरी पाट्यांना, नाही कोणाची तोड,
मी मुंबईची आहे पण मला, __________ पुणेकरांची लागली ओढ.3- जगणे नवे, वाटे मला,
__________ राव, या जन्मी भेटुनी तुला.4- रंग रूप बघून, नका करू लग्न,
______________ भेटली मला प्रेमळ, तिच्यात झालो मी मग्न.5- पानांच्या जाळीत लपोनि, चंद्र पाहतो गडे,
____________ तुझ्या भेटीसाठी, जीव सारखा उडे.Easy Marathi Ukhane For Girl
6- ज्या झाडांनी सावली दिली, त्यांची विसरू नका छाया,
____________ रावांचे नाव घेते, तुम्हा सर्वांची अशीच असुदे आमच्या जोडीवर माया.7- दिप आहे कुटुंब, मुले त्यात ज्योती,
___________ राव आहेत शिंपले, आणि मी एक त्यात मोती.8- लग्न कार्याने घर उजळून आले, झाले सारे दंग,
__________ रावांसोबत आजपासून, असेन मी संग.9- सुगंधी फुलांना, नशा आज आली,
___________ रावांच्या प्रेमात, मी मद्यधुंद झाली.10- नव्या संगीतातले, तराणे नवे असे,
_________ राव भेटले मला, जसे हवे तसे.11- आई बाबांचा आरोप आहे, जावई नाही बोलके,
____________ तुमच्यासोबत राहून, माझे मन होते हलके.

