Ukhane For Female

मराठी उखाणे टाईमपास | Marathi Ukhane Timepass

Ravi
Marathi Ukhane Timepass

Marathi Ukhane Timepass हे फार मजेशीर आहेत तुम्हाला फार आवडतील. या वेबसाईटमध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे उखाणे मिळतील. उखाणे घेणे म्हणजे आनंदाचा क्षण असतो. आपल्या महाराष्ट्राला उखाणे घेण्याची परंपरा लागली आहे ही परंपरा अशीच कायम ठेवूया. कोणताही कार्यक्रम असेल तर उखाण्यांची फार डिमांड असते. या डिमांड पूर्ण करण्यासाठीच हि वेबसाईट बनवली आहे. हे उखाणे आवडल्यास नक्की शेअर करा सर्वांसोबत.

1- सुखांच्या फुलांचा, कसा गंध सांगू,
________ प्रेमळ भेटले, देवाकडे आणखी काय मागू.

2- तुझ्या नजरेतील जादू, तुझ्या चालीतला डौल,
देवबाप्पाने दिला होता मला, ________ रायांचाच कौल.

3- तुफान दर्या, चंदेरी रात,
________ रावांसोबत हवी, साथ जन्माची साथ.

4- या गगनाच्या नीलछतावर, चमकदार चंद्राचे झुंबर,
आणि परबांच्या घरात, _________ चे पाऊल पडले आहे सुंदर.

5- मजला कुठे न थारा, मजला नसे निवारा,
_______ रावांच्या सहवासात, भेटला मला किनारा.

6- कळ्यांचे दिवस, फुलांच्या राती,
________ राव हवेत मला, ७ जन्माचे साथी.

7- चॉकलेटचा बंगल्याला, टॉफीचे दार,
________ रावांनी केला मला, सोन्याचा हार.

8- थेंब दवाचे करती चमचम, गवतावरती,
________ रावांचे प्रेम उठून, दिसते माझ्यावरती.

9- असा धुंद वारा, अशा चंद्र तारा,
_________ रावांमध्ये, अडलाय माझा जीव सारा.

10- लांब सडक केस माझे, त्यावर मोगऱ्याचा गजरा,
आमच्या जोडीवर आहेत, सर्वांच्या नजरा.

11- यांच्याशिवाय माझे, हालत नाही पान,
________ रावांचे नाव घेते, खुले आहेत ना तुमचे कान.

12- घरातले हिच्या म्हणतात, पोरी जरा जपून चाल,
__________ तुला बघताच, होतात माझे हाल.

13- तोल सावरत, साडी आवरत आज मी आले,
नटून थटून मी _________ तुमच्यासाठी तयार झाले.

14- वसंत वनात, पशु पक्षी हासे,
_______________ रावांचे नाव नेहमी, माझ्या मनात वासे.

Ravi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *