Ukhane For Male

Marathi Ukhane For Wife

Ravi
Marathi Ukhane For Wife

Marathi Ukhane For Wife हे उखाणे खास पुरुषांसाठी लिहिले गेले आहेत. जर तुमचे लग्न झाले असेल तर हे उखाणे तुम्ही लग्नकार्यात घेऊ शकता. या वेबसाईट मध्ये तुम्हाला भरपूर प्रकारचे उखाणे मिळतील. इंटरनेटवर उखाणे भरपूर आहेत परंतु या वेबसाईट मध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे उखाणे मिळतील.

Marathi Ukhane For Wife हे उखाणे तुम्ही अगदी सहजपणे घेऊ शकता यामध्ये काही तुम्हाला अडथळे येणार नाही आणि जर तुम्हाला हे उखाणे आवडले असते तर नक्की आपल्या मित्र परिवारांसोबत शेअर करा.

1- आकाशातल्या ताऱ्यांसारखी आहे, आमच्या प्रेमाची कहाणी,
_________________ दिसते साधीभोळी, पण आहे फार शहाणी.

2- तू नसताना माझे जीवन होते, अंधाराचा खेळ,
______________ तुझ्या येण्याने माझ्या, आयुष्यात खुली झाली प्रकाशाची वेळ.

3- देवाच्या देणगीमुळे, मला भेटली हिची साथ,
____________ चा मी, ७ जन्मासाठी पकडला हात.

4- तुझ्याविना माझे जीवन होते, कागदासारखे कोरे,
______________ कडून हवेत मला, भविष्यात २ पोरे.

5- माझे लग्न केव्हा होईल, याची आई बाबांना होती खूप व्यथा,
______________ सोबत लिहेन आता, आमच्या जीवनाची कथा.

6- कुणीतरी प्रेमळ साथीदार भेटेल, हे स्वप्नात पाहिल,
________________ अखेर भेटली, तिने माझ्या नावाच कुंकू लावील.

7- तुमची आणि आमची, वेगळी आहे रीत,
______________ ला काहीही करायला सांगा, ती नाही कशाला भीत.

8- त्या शपता हळव्या, हळवे प्रेम उखाणे,
____________ च नाव घेतो, आम्हाला राहूदया सुखाने.

9- स्थळ आले होते खूप, पण थांबलो होतो तुझ्या होकारा साठी,
__________________ सोबत अखेर जुळल्या माझ्या, रेशीम गाठी.

10- पाऊस पडला कि अंगणातल्या मातीलाही, सुचतात गाणी,
__________________ आहे तुमच्यासाठी सून, पण माझ्यासाठी एक राणी.

Ravi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *