Ukhane For Female

Majedar Ukhane Marathi

Ravi
Majedar Ukhane Marathi

Majedar Ukhane Marathi हे खास महिलांसाठी लिहिले गेले आहेत. असे उखाणे तुम्हाला इंटरनेटवर फार कमी बघण्यास मिळतील. उखाण्याची परंपरा आपण कायम ठेवली पाहिजे. आपल्या प्रत्येक येणाऱ्या पिढीला उखाण्याचे काय महत्त्व असते हे आपण या वेबसाईटच्या माध्यमातून सर्वांना सांगत आहे.

Majedar Ukhane Marathi जर तुम्हाला आवडले असतील तर नक्की आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि हि वेबसाईट संपूर्ण चेक करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन उखाणे मिळतील.

1- नाते तुमचे माझे, ७ जन्मांचे जुळले,
____________ रावांसोबत घरी येताच, सर्वांचे चेहरे खुलले.

2- सारख मनात वाटत, तुमचाच चेहरा ठेवावा साठवून,
______________ रावांचे नाव घेते, गणपती बाप्पाला आठवून.

3- आयुष्याच्या प्रत्येक प्रवासात असावी, फक्त तुझीच साथ,
___________ राव कधी दुःखात तर कधी सुखात, नेहमी द्या हातात हाथ.

4- आजपासून आपण सोबत, एकत्र रहायच,
_______________ तू माझ्यासाठी मी, आणि मी तुझ्यासाठी जगायच.

5- कळत नकळत, सारे घडले,
________ राव मला बघताच, प्रेमात पडले.

6- कोऱ्या अश्या कागदावर, आमच्या प्रेमाची अक्षरे कोरली,
____________ रावांच्या नावाची अखेर, गळ्यात घातली डोरली.

7- चंद्रासोबत चांदणी जशी, तसा माझ्यासोबत राहशील का?
__________ राव मला ७ जन्माची, साथ देशील का?

8- ह्यांचा स्वभाव बघून, दिल माझ बावरल,
_________ रावांचे नाव घेते, त्यांनी अखेर मला सावरल.

9- तू माझा चंद्र, मी तुझी चांदणी,
_____________ रावांसोबत अखेर, लग्नाची गाठ बांधली.

10- सागराप्रमाणे विशाल, आहे यांचे मन,
____________ रावांसोबत साजरा करेन, आता प्रत्येक सण.

11- तू लावण्यवती, सुंदर तुझी अदा ग,
____________ ला बघतो जेव्हा, मी नेहमी होतो फिदा ग.

12- मन हे मनच असत, कसे त्याला सावरू,
____________ रावांचे नाव घेते, माझ्या चिडक्या स्वभावाला कसे आवरू.

Ravi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *