Ukhane For Male

Marathi Ukhane For Girlfriend | गर्लफ्रेंडसाठी उखाणे.

Ravi
marathi ukhane for girlfriend

Marathi Ukhane for Girlfriend हे खास मुलींसाठी मुले घेऊ शकतात. तुमचे जर कोणत्या मुली वर प्रेम असेल तर तिला खुश करण्यासाठी हे उखाणे घेऊ शकता. लग्नासाठी तिला मागणी टाकायची असेल तर नक्कीच हे उखाणे घ्या ती खूप आकर्षित किंवा प्रभावित होईल.

प्रत्येकाच्या आयुष्यात एखादी मुलगी असते जिच्यावर आपण खूप प्रेम करतो आणि तिला पत्नी बनवायची इच्छा असते. हे उखाणे तुम्ही डाउनलोड आणि शेयर करू शकता.

Marathi Love Ukhane for Girlfriend.

1- चेहऱ्यावर स्माईल येते, पाहून तुला,
________ आता लग्नासाठी, होकार दे मला.

2- प्रेम करायला काय, कोणपण करेल,
पण _____लाच मी, माझी बायको बनवेल.

3- बस झाली, ती आता दुरी,
______ आता माझी, लग्नाची ईच्छा कर पुरी.

4- गणपती बाप्पा समोर, दुर्वा रोज वाहतो,
_______ आपल्या लग्नाचं स्वप्न, मी रोज पाहतो.

5- दिवस रात्र तुझ्याच, विचारात असतो मी मग्न,
________ आता लवकर, उरकून घेऊया आपलं लग्न.

6- तुझ्या त्या विनोदावर, मी नकळत हसलो,
_____ च्या प्रेमात मी, कसाकाय फसलो.

7- ती नेहमी बोलते, तू दुसऱ्या मुलींकडे बघून हसतो,
_____ अग सर्व मुलींमध्ये, मला तुझाच चेहरा दिसतो.

8- गणपती बाप्पाच्या आगमनाला, झाली आपली भेट,
_______ ला केली, पहिल्या भेटीतच सेट.

9- मागे तुझ्या वेडा पिसा, दूर करू नको मला,
_____ एकदा हो म्हण, वर्ल्ड टूर ला न्हेईन तुला.

10- माझा जीव, तुझ्या मध्ये अडकलाय,
_____ माझा हृदय फक्त, तुझ्यासाठी धडकलाय.

11- माझ्या हृदयाची काय सांगू दशा तुला, माझ्या मनात काय घडतंय,
_____ तुला बघून दिवाना झालोय, माझं काळीज धडधडतंय.

12- उद्या तुझ्या आई बाबांना, मी भेटायला येणार,
_______ तुला बायको बनवून, घरी न्हेणार.

13- मौसम आहे, आज मसताना,
____________ सोबत नसताना.

14- लग्न फक्त तिच्याशीच करेन, अशी मित्रांसोबत लावली होती बेट,
____________ ला अखेर लग्न करून, घरी आणली थेट.

15- आमची मैत्री झाली, भेटून समोर ऑफलाईन,
_______ रावांनी माझा नंबर घेऊन, प्रपोझ केला ऑनलाईन.

16- आयुष्याची दोरी, कुणाच्या तरी हातात देऊन बघा,
_______ सारखी साथीदार भेटली, तुम्हीपण एकदा प्रेम करून बघा.

17- तू दिसतेस खूप सुंदर साडीवर,
_____ तुला बायको बनवून फिरवेन गाडीवर.

Ravi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *