Ukhane For Female

101 Love Marriage Ukhane | लव मॅरेज उखाणे

Ravi
Love Marriage Ukhane

Love Marriage Ukhane. हे खास करून प्रेमविवाह केलेल्या जोडप्यांसाठी आहे. असे उखाणे तुम्हाला इंटरनेटवर फार कमी पाहायला मिळतील उखाणे घेणे ही महाराष्ट्राची परंपरा आहे आजकल सर्वजण नवीन नवीन उखाणे घेतात हे उखाणे जर तुम्हाला आवडले असतील तर नक्की तुम्ही तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा.

Love Marriage Ukhane हे नवीन आणि जुन्या जोडप्यांसाठी आहेत हे अतिशय गमतीदार आणि मजेशीर आहेत. उखाणे म्हटले की लोक फार मज्जा घेतात. नवीन लग्न झाल्यावर उखाणे घेतल्याशिवाय घरात प्रवेश करायला देत नाहीत.

1- कोवळ्या वयात, प्रेमाचा रंग येतो बरसून,
_________ साठी मी बसलो होतो, खूप तरसुन.

2- जीवनाच्या वाटेवर चालताना, मी पडेल किंवा हारेन,
परंतु शेवटपर्यंत मी, _________ तुझ्यावरच प्रेम करेन.

3- वाळूवर कोरलेल नाव, समुद्राचे पाणी आले की, एका क्षणात जाईल,
पण माझ्या हृदयात बसलेलं _________ रावांचं नाव, नेहमी मनात राहील.

4- जातीने जरी वेगळे असलो, तरी आपण सर्व आहोत मनुष्य,
___________ रावांच्या येण्याने, सुखी झाले माझे आयुष्य.

5- स्वर्गातून जुळल्या, साथ जन्माच्या गाठी,
__________ रावांचे नाव घेते, तुम्हा सर्वांसाठी.

6- पावलांनाही कळेना, कुठे चालली वाट,
_________ रावांसोबत बांधली, सात जन्माची गाठ.

7- ज्याचा जसा भाव, तसा देव दिसते,
_______ ची प्रतिमा, माझ्या मनी वसते.

8- पौर्णिमेच्या चंद्राची, उज्वल प्रभा,
________ राव हेच माझ्या, सौभाग्याची शोभा.

9- गणेशाच्या प्रेमाने, सगळी विघ्न पळती,
_______ रावांचे प्रेम पाहून, सवती मनात जळती.

10- आधी घातला चंद्रहार, मग घालती ठुशी,
_______ रावांचे नाव घ्यायला, माझी नेहमीच खुशी.

11- आईने वाढवलं, वडिलांनी पढवलं,
__________ रावांनी त्यांची होताच, सोन्याने मढवलं.

12- चांदीच्या समईत, रेशमाती वात,
_________ बरोबर करते, संसाराला सुरुवात.

13- शनिवार-रविवार जातो, पूर्ण बघण्यात वेब सिरीज,
______ आणि _______ च्या लग्नाची व्हिडिओ, आता होईल रिलीज.

14- तुलना करणे तुझ्याशी, कोणालाच शोभत नाही,
__________ तुझ्यासारखा रंग, असा त्या इंद्रधनुष्यातही नाही.

15- कुणीतरी मग माझे होईल, हात घेऊनि हाती,
______ रावांचे नाव घेते, चांदण्या काळोखाच्या राती.

16- साऊथच्या सिनेमांना, नाही कोणाची तोड,
_______ आहे साऊथ इंडियन, म्ह्णून मला लागली तिची ओढ.

17- हवेतूनि सुगंध, दरवळी पुन्हा,
__________ सोबत प्रेम केले, यात माझा काय गुन्हा.

Ravi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *