Marathi Ukhane for Wedding हे नवरा आणि नवरी दोन्हीकरिता आहेत. महाराष्ट्रात लग्नात उखाणे घेणे हि परंपरा आहे. उखाणे नाही घेतले तर घरात प्रवेश भेटत नाही हि एक गम्मत असते. महिलांना उखाण्याची फार आवड असते.
लग्नासाठी उखाणे चा फार शोध होतो आपल्यासाठी हि वेबसाईट उत्तम आहे. Marathi Ukhane for Wedding हे तुम्हाला खूप कमी मिळतील. हे उखाणे तुम्ही डाउनलोड आणि शेयर करू शकता.
1- पत्रिकेत ३६ गुण जुळले,
_____ तुमच्यामुळे, माझे जीवन फुलले.
2- शिर्डीमध्ये आहे साई बाबांचे मंदिर,
_______राव आहेत, माझ्या पाठीशी खंबीर.
3- काश्मीर ला भेटते, छान शाल,
______ रावांच्या जीवनात, राहील खुशाल.
4- सुटिंग, शर्टींग आणि कटपिसेस,
______ राव माझे मिस्टर, आणि मी त्यांची मिसेस.
5- फुलात फुल जाईचे, प्रेमात प्रेम माईचे,
______ राव आहेत, भक्त मोठे साईंचे.
6- सरस्वतीच्या मंदिरात, साहित्याच्या राशी,
________ रावांचे नाव घेते, शुभ मंगल दिवशी.
7- आई वडिलांना, नातं आमचं आवडलं,
______ रावांनी जीवनासाठी, मला निवडलं.
8- तुमच्या सर्वांचा, आशिर्वाद आहे लाखाचा,
________ रावांसोबत संसार, करेन सुखाचा.
9- हिमालयात पर्वतावर, बर्फाचे ढिगारे साठले,
_______ रावांच्या नावाचे, मी मंगळसूत्र घातले.
10- संसार निट नेटका ठेवायचे, आता ओझे वाढले,
आणि _______ च्या रूपात, अनमोल असे रत्न नशिबी लाभले.
11- बकुळीचे फुले सुकले तरी, हरवत नाही गंध,
______ रावांसाठी माहेर सोडले, तरी राहतील मनात स्मृतीबंध.

